पोलीस स्टेशन पुराडा चा उपक्रम जनजागरण मेळाव्याच्या माध्यमातुन दिला शासकिय योजनांचा लाभ

तालुका प्रतिनिधी कुरखेडा संजय मानकर


जिल्हा पोलीस प्रशासना अंतर्गत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून मा. पोलीस अधिक्षक श्री. निलोत्पल सा, अपर पोलीस अधिक्षक अभियान श्री अनुज तारे सा, अपर पोलीस अधिक्षक श्री कुमार चिता सा व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री साहील झरकर सा कुरखेडा, यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन पुराडाच अमर स्वरुप फाउंडेशन नागपुर यांचे संयुक्त विद्यमाणे मौजा बिजापुर येथे दिनांक २४/०२ / २०२३ रोजी भव्य जनजागरण मेळावा व नेत्र तपासणी शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री दिघोडे सा. वनपरीक्षेत्र अधिकारी पुराडा हे होते. उद्घाटक म्हणुन श्री कुकडे सा. महिला बालविकास अधिकारी पंचायत समिती कुरखेडा, प्रमुख पाहुणे म्हणुन श्री सपोनि भुषण पवार सा. प्रभारी अधिकारी पोस्टे पुराडा, पोउपनि प्रतापसिंह जाधव सा. पोस्टे पुराडा, डॉ. तरफदार नेत्ररोगतज्ञ ग्रामीण रुग्नालय कुरखेडा. डॉ. भांडारकर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र खेडेगाव व पोस्टे परीसरातील पोलीस पाटिल हजर होते.


सदर जनजागरण मेळाव्याचे प्रास्ताविक सपोनि पवार सा. यानी केले व त्यानी आपल्या प्रास्ताविकात पोलीस दादालोरा खिडकि च्या माध्यमातुन दिल्या जाणाऱ्या सर्व शासकिय योजनाबाबत मार्गदर्शन करून उपस्थित जनसमुदायाला सर्व शासकिय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच मंचावर उपस्थित विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यानी आपआपल्या विभागाअंतर्गत येनाऱ्या शासकिय योजनाबाबत मार्गदर्शन केले.


भव्य जनजागरण मेळाव्यात पोलीस स्टेशन पुराडा हद्दितील नागरीकांना पोस्टे कडुन ५० ब्लॅकेट, ६५ साडी, ५०घमेले, २५० केळी रोपे, १० पॉकेट कुपोषित बालक आहार पावडर, ०१ बेबी केअर किट, ३५ बुक, ३५ पेन, ४० गोडी कॅलेडंर, १२ चष्मे, ३०आय ड्रॉप इत्यादी साहीत्य वाटप करण्यात आले व ४० लोकांची शुगर तपासणी, ४६ लोकांची बि.पी. तपासणी, ३८ लोकांची नेत्र तपासणी, ३२ ई श्रम कार्ड, ४५ आयुष्यमाण भारत कार्ड, ०७ पॅन कार्ड, ०२ हेल्थ कार्ड, ११ आधार कार्ड, ३५ डिजीटल सातबारा, ३८ आयुष्यमाण भारत केवायसी, १३ बैंक खाते, १३ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, १६ आर डी खाते, ०४ पिएम किसान केवायसी इत्यादी शासकिय योजनांचा मोफत लाभ देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी अधिकारी सपोनि भुषण पावार यानी केले तर सुत्रसंचालन पोहवा अमृत मेहर यांनी केले. व आभार प्रदर्शन अमलदार गौतम दुर्गे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता पोलीस स्टेशन पुराडा चे अधिकारी, अमलदार व एस.आर.पि.एफ चे, अमंलदार यानी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post