कंडेम नगरसेवक आणि कंडोम आमदार!



राष्ट्रवादी चे श्री दिपक शिर्के साहेब यांनी जळगाव दौरा केला. दुपारी तीन वाजता मला फोन केला.शिवराम पाटील तुम्ही खूप चांगले लिहीतात.राजनिती, धर्म, अर्थ विषयांवर.मी वाचतो.मी आपणास भेटू इच्छितो.तर या.
म्हणून मी माझे साथीदार सहित भेटलो.त्यांचे जळगाव मधे स्वागत केले.पक्षात प्रवेश नाही.जळगांव जिल्ह्यातील राजकारण व आमचा रोड मॅप वर चर्चा केली.
  कदाचित त्यांनी लेखन च्या निमीत्ताने माझ्या सामाजिक, प्रशासकीय, राजकीय, आर्थिक ज्ञानाची ,कृतीची महिती जाणून घेण्यासाठी भेट घेतली असावी.
         आम्ही जळगाव चे नागरिकांनी कांग्रेस, राष्ट्रवादी सेना, भाजपचा अनुभव घेतला.निराश,हताश झाले आहेत.ती पोकळी भरून काढण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.फडणवीस,पवार, राहुल किंवा ठाकरे असे कोणीही जळगाव चा विकासासाठी विचार करीत नाहीत.केला नाही.किमान सोयीसुविधा बाबत सुद्धा नाही.त्यांना फक्त येथून आमदार पाहिजे.खासदार पाहिजे.निधीतून कमीशन परत आणून देणारा आमदार खासदार पाहिजे.चोरी करून आणून देणारा बिनडोक माकड पाहिजे.म्हणून दारूवाला,रेती वाला, डान्सबार वाला, सट्टावाला माणसाला नगरसेवक, आमदार,खासदारांची उमेदवारी देतात. म्हणजे शंभर कोटी देऊन वीस कोटी परत पाहिजे.बाकी निधी मधे मक्तेदार, आमदार धरून घ्या.असे धोरण फडणवीस, पवार, राहुल, ठाकरे यांचे आहे.यासाठीच तर मुंबई, पिंपरी चिंचवड, नाशीक , औरंगाबाद धनवान महापालिका हवी असते.
     आता शिंदे साहेब जो निधी गुवाहाटी रिटर्न आमदारांना देत आहेत.त्यात वीस टक्के दक्षिणा मुख्यमंत्री ,पांच टक्के अर्थमंत्री,,वीस टक्के आमदार,पंधरा टक्के मक्तेदार .उरलेलली डांबर किंवा सिमेंट रस्त्यावर चोपडतात.रस्त्यावर म्हणजे नागरिकांच्या थोबाडीवर चोपडतात. जर नगरपालिका कडून निधी आला असेल तर वीस टक्के मुख्यमंत्री,पांच टक्के अर्थमंत्री,वीस टक्के नगरपालिका अधिकारी,वीस टक्के महापौर व नगरसेवक.उरलेले डांबर किंवा सिमेंट रस्त्यावर चोपडतात.म्हणून जळगाव शहरातील रस्ते कंडेम बनवले आहेत.येथील नगरसेवकांना ते कंडेम आमदारांना कंडोम सारखे वापरून घेतात.उदाहरण देतो.जळगावचे आमदार सुरेश भोळे यांच्यात हिंमत नाही कि,शिंदेंना निधी बाबत जाब विचारू शकतील किंवा गुलाबराव पाटलांना जाब विचारू शकतील.उलट भोळेंनी शिंदेंच्या कौतुकाचे मोठमोठे सैन्य लावले. शिंदेसाहेब, जळगाव चे माकडछाप नगरसेवक व आमदारांना विकत घेण्यासाठी जळगाव ला या.हे असे आमदार आणि नगरसेवक युज आणि थ्रो सारखे असतात.कंडेम आणि कंडोम.
       जळगाव मधे आता स्थानिक स्वराज्य संस्था चालवणारे,सांभाळणारे , विकास करणारे नगरसेवक आणि आमदार पाहिजे.अशी भावना बळावली आहे.
     एकनाथ खडसेंनी आता मंत्री पद गेल्याचे दुःख उगाळू नये.मंत्रीपद जाणे म्हणजे अबोर्शन होणे असते.आता नवीन उभारी घेऊन काम केले पाहिजे.अजूनही खडसेंचे,देवकरांचे आकर्षण आर्थिक संस्थाकडेच दिसून येते.जिल्हा,बॅंक ,दूध फेडरेशन वगैरे.अंधारातील राजकारण.मीडनाईट पॉलिटिक्स.आता आम्हाला मीड डे पॉलिटिक्स करणे आवश्यक आहे.
     जळगाव शहरातील मतदार खरेदी विक्री करण्याची परंपरा मोडीत काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.फुकटाचे मतदान आणि स्वस्तातले इलेक्शन.

... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.

Post a Comment

Previous Post Next Post