नागरिकांनो आता घाबरू नका.. मुख्यमंत्रीकडे सरळ करा तक्रार


गडचिरोली :- जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी जिल्ह्यातच सुटाव्या, त्यांना मंत्रालयात जाण्याची गरज पडू नये; तक्रारदारांची गैरसोय होऊ नये; यासाठी १५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात सामान्य नागरिक आपल्या तक्रारी संदर्भात निवेदन देऊ शकणार आहे. विशेष म्हणजे, या तक्रारींची जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी तपासणी करून तात्काळ निकाल देणार आहेत.शासनस्तरावर प्रश्न असेल तर तात्काळ तक्रारीला शासनाकडे पाठवली जाणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची मंत्रालयातील वारी टळणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.निवासी उपजिल्हाधिकारी हे या विभागाचे प्रमुख आहेत. सामान्य नागरिकांनी आपल्या तक्रारी घेऊन मंत्रालयापर्यंत न जाता जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन झालेल्या मुख्यमंत्री सचिवालयामध्ये दिल्यास वेळ, पैशाची बचत होईल सोबतच तक्रारी त्वरित सोडवून न्याय सुद्धा मिळू शकतो.

Post a Comment

Previous Post Next Post