पगार भेटला नाही म्हणून झाडावर चढुन आमगावच्या शिपायाचा आत्महत्येचा प्रयत्न



आमगाव, (वा.). येथील येथील तहसील कार्यालयात कार्यरत एका शिपायाने तहसील कार्यालय परिसरातील पिंपळाच्या झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (ता. 27) दुपारी घडली. राकेश बोरकर असे शिपायाचे नाव आहे. या प्रकाराने तहसील कार्यालय प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.

येथील तहसील कार्यालयात मागील ऑगस्ट महिन्यापासून राकेश शिपाई पदावर कार्यरत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मागील सहा महिन्यांपासून राकेशचे वेतन झालेले नाही. सहा महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने राकेश आर्थिक सकंटात सापडला. यातच त्याच्यावर झालेली उधारी मागणाऱ्यांचा सतत तगादा उधारीची रक्कम वाढल्याने कोणीही उधार देण्यास तयार नसल्याने कटंबाचा

उदरनिर्वाहाचा प्रश्न राकेश समोर निर्माण झाला. आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा या विवंचनेत राकेश होता. परिणामी आर्थिक विवंचनेत राकेशने तहसील कार्यालय परिसरातील पिंपळाच्या झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचे सांगितल्याने तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि विविध कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी त्याची समजूत काढत झाडावरून खाली उतरविले.

Post a Comment

Previous Post Next Post