नक्षल्यांच्या हल्ल्यात तीन जवान शहीद; सहा नक्षल्यांना कंठस्नान



छत्तीसगडमधील घटना

सुकमा: छत्तीसगडमधील सुकमा येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी चकमक झाली असून यामध्ये ३ जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) जवान शहीद झाले आहेत. तर २ जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. तसेच चकमकीत सहा नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. कुंडा आणि जागरगुंडा येथे ही चकमक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा
👇👇👇👇👇


सकाळी ८.३० वाजता चकमक सुरू झाली. नक्षलवादी आधीच जवानांच्या मागावर बसले होते. त्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात जवानांनीही गोळीबार केला. यात सहा नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले तर तिघा जवान शहीद झाले. पोलीस महानिरीक्षक (बस्तर श्रेणी) सुंदरराज पी. यांनी सांगितले की, डीआरजीचे पथक शोध ,

हेही वाचा
👇👇👇👇👇

मोहिमेवर असताना जागरगुंडा आणि कुंडा गावांमध्ये सकाळी ९ वाजता चकमक सुरू झाली. राजधानी रायपूरपासून ४०० किमी अंतरावर असलेल्या जागरगुंडा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे. जागरगुंडाजवळ नक्षल्यांच्या हल्ल्यात ३ जवान शहीद झाल्याबद्दल मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. नक्षलवाद्यांच्या या भ्याड कृत्याचा निषेध करत मुख्यमंत्री बघेल म्हणाले की, जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.

Post a Comment

Previous Post Next Post