चुचुंद्रीने दिव्याची पेटती वात नेली अन् घरच जळाले



ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरीच्या कुर्झा वार्ड गुरुवारी सायंकाळी प्रमोद सीताराम ढोंगे यांच्या घरातील दिव्याची पेटती वात चुचुंद्रीने (उंदीर) नेली, ती वात घरातील कोणत्यातरी कापडावर पडून घराला आग लागली. यात घरातील लाखोचे साहित्य जळून खाक झाले. घरमालक प्रमोद ढोंगे हे गुरुवारी

दुकानात आपल्या कामावर गेले होते.. त्यांची आई बाहेरगावी आणि त्यांची पत्नी शेजारी लहान मुलीला खेळवत होती. अशातच तुळशीजवळ पेटत असलेल्या दिव्याची पेटती वात चुचुंद्रीने नेली. ही वात घरात कपड्यांच्या ठिकाणी पडली अन् कपडे पेटून भडका उडाला. यात घरातील साहित्य जळून खाक झाले.

Post a Comment

Previous Post Next Post