चलो चलो दारू प्यायला लाडज चलो...


ब्रम्हपुरी :- प्राप्त झालेल्या माहितीनुसार ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज या गावामध्ये अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात देशी दारू विक्री केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे.
दारूमुळे लाडज येथील दारुविक्रेते मालामाल होत आहेत याउलट तळीरामां सारख्या अनेकांच्या आयुष्याची वाताहात होतांना दीसुन येत आहे. कित्येकांचे संसार उघड्यावर पडल्याची विचीत्र परीस्थीती निर्माण होत आहे. परंतु दारू पिणाऱ्यांची संख्या कमी होतांना दिसत नाही काही.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारू वरील बंदी हटविण्यात आली आहे. परंतु लाडज गावातील वैनगंगा नदी मध्ये खुलेआम देशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. त्यामुळे गावातील शांतता भंग होत आहे . या दारूचा आस्वाद घेण्याकरिता लाडज, सावंगी , मेंढा परिसरातील नागरिक सकाळ - सायंकाळी लाडज वैनगंगा नदी येथे जाऊन आपले शौक पूर्ण करीत असतात. जणू काही त्यांना पोलीस विभागातर्फे परवाना दिला आहे की काय अशी परिस्थिती या गावांमध्ये दिसत आहे.


लाडज गावातील तंटामुक्त समिती सुद्धा याकडे दुर्लक्ष करून कुठल्याही दारू विक्रेत्यावर अजूनही कारवाई केलेली नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याने या दारू विक्रेत्यांना पोलिसांचा आशीर्वाद आहे तर नाही ना? अशा नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे.

पोलीस,तंटामुक्त समितीला दारू पकडण्याचे अधिकार असून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे.

त्यामुळे तंटामुक्त समितीने आपला अधिकार वापर करून अशा दारू विक्रेत्यांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करणे अत्यावश्यक आहे. आज प्रत्येक जवळ मोबाईल आहे मोबाईलच्या माध्यमातून संबंधित दारू विक्रेत्याची फोटो किंवा शूटिंग करून आपण पुरावा सादर करू शकतो हा पर्याय तंटामुक्त समितीकडे असतो. जेणेकरून पोलीस प्रशासनाला कारवाई करण्यास अडचण होणार नाही.

रोज सकाळ आणि सायंकाळी लाडज मधील वैनगंगा नदी मध्ये तरी काही जण घरून दारू विक्री करतात. दारू पिऊन अनेकांचा नदीमध्ये भांडण होते तर बरेच लोक नदीमध्ये पडून दिसतात . हे नित्याची बाब बनलेली आहे. भविष्यात अशा दारुमुळे अशी कुठलीही जीवित हानी घडली तर याला जबाबदार कोण? हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे.

पोलीस प्रशासन तर अशा दारू विक्रेत्यावर आपला आशीर्वाद ठेवून "मील बाटकर खाने से प्यार बढता है" "तेरी भी चूप मेरी भी चूप " या युक्तीप्रमाणे दारू विक्री त्यांना खुली सवलत दिलेली आहे.

त्यामुळे अशा मुजोर दारू विक्रेत्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर / गडचिरोली यांनी लक्ष देऊन तात्काळ या दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी परिसरातील महिला व नागरिकांनी केली आहे.




Post a Comment

Previous Post Next Post