बस कंडक्टरने दारू पिण्यासाठी प्रवाशांनी भरलेली बस रस्त्याच्या मधोमध सोडून काढला पळ


लातूर:-सरकारी बसच्या कंडक्टरचे अजब कृत्य समोर आले आहे. काल गुरुवारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस कंडक्टरने दारू पिण्यासाठी प्रवाशांनी भरलेली बस रस्त्याच्या मधोमध सोडून पळ काढला. त्यामुळे अनेक तास बस तेथेच थांबली होती. सध्या कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी लातूर आणि उस्मानाबादमधील कळंब दरम्यान घडली. इकडे कंडक्टरने काटगाव येथे बस थांबवली आणि खाली उतरला.यानंतर तासाभराहून अधिक प्रतीक्षा केल्यानंतर बसमधील सुमारे ३८ प्रवाशांनी त्याचा शोध सुरू केला. बराच प्रयत्न केल्यानंतर तो एका दुकानात दारू पित बसलेला आढळून आला. आरोपी कंडक्टरवर कारवाई करण्यात आल्याची माहिती एमएसआरटीसी उस्मानाबाद विभागीय वाहतूक नियंत्रक यांनी दिली. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला निलंबित करण्यात आले. ड्युटीवर असताना कंडक्टरने मा प्राशन केल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाले.

Post a Comment

Previous Post Next Post