मुलुंडमध्ये सांघिक कवायत स्पर्धा संपन्न



प्रतिनिधी : दिलीप अहिनवे, मुंबई
मुलुंड, दि. ८ : मुलुंड 'टी' विभागातील गोशाळा मार्ग शाळा संकुलात आज विभागीय सांघिक कवायत स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. कवायत संचलन, लेझीम, फॅन्सी ड्रिल व फ्रॉलिक्स या चार प्रकारात स्पर्धा घेण्यात आल्या. १६ शाळांच्या जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. विजयी व उपविजयी संघांना ट्रॉफी व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी स्पर्धकांना खाऊ देखील देण्यात आला.

कार्यक्रमाला पाहुणे म्हणून मुलुंड 'टी' विभागाचे प्रशासकीय अधिकारी (शाळा) कैलाशचंद्र आर्य, कनिष्ठ पर्यवेक्षक शिवदत्त कोठेकर, मुख्याध्यापक मधुकर शिंदे, सुनिता प्रजापती, ब्युएला नाडर, प्रीती चहांदे, प्रशिक्षक व पालक उपस्थित होते. 

कनिष्ठ पर्यवेक्षक शिवदत्त कोठेकर यांनी सांगितले की, कोराना महामारीमुळे सांघिक कवायत स्पर्धा पुर्णपणे बंद होत्या. यावर्षीपासून या स्पर्धा सुरु झाल्यामुळे मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी
शारीरिक शिक्षण शिक्षक यशवंत चव्हाण, नरहरी कोकरे, दिनकर फेगडे, भालचंद्र यादव, प्रशांत देऊळकर, अनुजा दळवी, अपर्णा बागुल, मीना महाडिक, शर्मिला पवार, दिलीप अहिनवे, दिपक आंब्रे, गंगाधर गज्जलवार, ललित जाधव, सविता पाटील व अनिल पाटील यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post