गहाणेगाटा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उदघाटन



कोरची:-तालुका मुख्यालयापासून दहा कि मी अंतरावर असलेल्या गट ग्रामपंचयात बोरी अंतर्गत येत असलेल्या मौजा गहाणेगाटा येथे वनश्री कला व विज्ञान महाविद्यालय कोरची याच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे ' जलसंवर्धन व मतदार जनजागृतीसाठी युवक' याविषयकरिता शिबिराचे आयोजन दिनांक०६/०२/२०२३ते १२/०२/२०२३पर्यंत करण्याचे ठरविण्यात आले आहे या सात दिवसीय कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा दिनांक०७/०२/२०२३रोजी बोरी येथील प्रतिष्ठित नागरिक मा कृष्णाजी नरडंगे यांच्या हस्ते संपन्न झाला . कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले पाहुण्यांचे स्वागत रा से यो च्या विद्यार्थिनींच्या चमूने स्वागत गीताने केले .

   कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वनश्री महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा मनोजभाऊ अग्रवाल होते .प्रमुख अतिथी म्हणून बोरी गटग्रामपंचयात सरपंच मा सावजी बोगा ,गहाणेगाटा चे पोलीस पाटील मा भगवानसाय बोगा , वनश्री महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य तथा रा से यो कार्यक्रम अधिकारी मा डॉ विनोद टी चहारे ,गहाणेगाटाचे प्रतिष्ठित नागरिक मा तानुरामजी पोरेटी ,गहाणेगाटा येथील जि प प्राथमिक शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा विश्वनाथ हलामी ग्रामसभा अध्यक्ष मा तिलक उईके ,सपंतजी बोगा, महेंद्रसिंग नैताम,जि प प्रा शाळेच्या शिक्षिका कु .चावर प्रा रुखमोडे प्रा रोटके आदि प्रमुख उपस्थित होते .
         कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून बोलतांना मा कृष्णाजी नरडंगे म्हणाले की,राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामधून विद्यार्थ्यांनी श्रमसंस्काराचे धडे घेऊन श्रमाचे महत्व समाजातील तरुण मंडळींना पटवून द्यावे असे आवाहन रा से यो शिबिरार्थयाना केले .गहाणेगाटा येथील तरुणांनी या शिबिरात सहभागी होऊन आपल्या गावाची स्वच्छता करावी व गाव निर्मल करावे असेही ते यावेळी म्हणाले.बोरी ग्राम पंचायतीचे सरपंच मा सावजी बोगा यावेळी म्हणाले की, या शिबिरामध्ये विद्यार्थांनी चांगले गुण आत्मसात करावे व श्रमाची लाज न बाळगता श्रम करावे असेही ते यावेळी म्हणाले.
           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना मा. मनोजभाऊ अग्रवाल म्हणाले की, सात दिवसीय शिबिरामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थांनी श्रमदान करत असतांना आपल्या मनात अशी भावना रुजवावी की,मी स्वतःसाठी जगणार नाही तर मला समाजासाठी जगायचं आहे .हे जीवनमूल्ये घेऊन आपण घरी गेलो पाहिजे जोपर्यंत आपण दुसऱ्यासाठी कष्ट करणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचे सार्थक होणार नाही खरा भारत खेळयामध्ये आहे ही संकल्पना आपण विसरून चालता येणार नाही म्हणूनच म गांधीजीनी' खेळयाकडे चला 'असा नारा दिला होता खेळयामधिल जंगल वाचवून जलसंवर्धन करण्याची फार मोठी जबाबदारी विद्यार्थ्यांनी सांभाळायची आहे असेही ते म्हणाले कार्यक्रमाच्या दरम्यान प्रा रुखमोडे सर यांनीसुद्धा आपले विचार मांडले .
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य तथा रा से यो कार्यक्रम अधिकारी मा डॉ विनोद टी चहारे यांनी केले तर आभार प्रा प्रदीप चापले यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा गुलाब बावनथडे यांनी केले 
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा संजय दोनाडकर प्रा चक्रलाल मांडवे व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच रा से यो चे विद्यार्थी यांनी सहकार्य केले
    कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ महिला व पुरुष उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post