गळफास घेऊन इसमाची आत्महत्या




 आष्टी : चामोर्शी तालुक्यातील मलेझरी येथे एका इसमाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारी १२ वाजता उघडकीस आली. धर्मराव नानाजी मडावी (३५) रा. डोंगरगाव, ता. गोंडपिपरी असे मृताचे नाव आहे.

मडावी हे आपल्या पत्नीसोबत सासरे सुधाकर लिंगजी गेडाम यांच्याकडे मलेझरी येथे राहत होते.

शुक्रवारी सकाळी १० वाजता रेशनच् धान्य आणतो म्हणून घरून निघून गेले परंतु, ते परत आलेच नाही. त्यांचा शोध घेतला असता गावात कुठेच सापडले नाही. शनिवारी सकाळी वाजतादरम्यान गावातील एक इसम प्रात:विधीसाठी गावाच्या बाहेर गेल असता त्याला धर्मराव हे आंब्याच्य झाडाला फाशी लागून लटकलेल्य अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

Post a Comment

Previous Post Next Post