मासेमारी करताना तरुणाचा वनतलावात बुडून मृत्यू





चंद्रपूर:  वढोली गोंडपिपरी येथील वनविभागाच्या काष्ट आगाराजवळ असलेल्या वनतलावात मासेमारीकरिता गेलेल्या ३८ वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. मृतकाचे नाव देविदास बंडू मडावी असून, तो गोंडपिपरी येथील भगतसिंग वार्डाचा रहिवासी आहे.

देविदास मडावी हा आपल्याच वॉर्डातील एका सहकारी मित्रासोबत अधूनमधून मासे पकडण्यासाठी वनतलावात जात होता. दरम्यान, शनिवारीदेखील तो मासेमारीसाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत तलावावर गेला. तिथे त्यांनी तलावात मासे  पकडण्याकरिता जाळेदेखील टाकले. काही वेळानंतर त्याचा सहकारी हा पाण्याबाहेर निघाला. बऱ्याच वेळानंतर

खोलवर पाण्यात गेल्यामुळे देविदास मडावी तलावामधून बाहेर निघालाच नाही.. यातच सहकाऱ्याला शंका आली. त्यांनी तलावाकडे जाऊन पाहिले असता देविदास कुठेच दिसला नाही. त्यामुळे घाबरलेल्या त्याच्या मित्राने या घटनेची माहिती कुटुंबीय व गावातील लोकांना दिली. लगेच काही मंडळी तलावाकडे गेली असता त्यांना देविदास मडावी याचा मृतदेह तलावानजीक काठावरील पाण्यात दिसला. गोडपीपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू आपल्या पोलिस सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पुढील तपास ठाणेदार जीवन राजगुरू करीत आहेत. देविदासच्या मागे आई- वडील, भाऊ असा आप्तपरिवार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post