विदर्भ वेगळा पाहिजे असेल तर यात्रात सामील व्हा...


जय विदर्भ ! विदर्भ राज्य आंदोलन समिती,स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचे आंदोलन तीव्र करण्या करिता व जनजागृती करण्याकरिता विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे २१ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२३ या कालावधीत पूर्व विदर्भातुन एक आणि पश्चिम विदर्भातुन एक अश्या प्रमाणे दोन विदर्भ निर्माण यात्रा काढण्यात येणार आहेत.



दोन्ही यात्रांचा समारोप ५ मार्च २० २३ ला संविधान चौक नागपुर ला दुपारी १ वाजता जाहीर सभेने होणार आहे.पूर्व विदर्भातील विदर्भ निर्माण यात्रेचा प्रारंभ कालेश्वर या पवित्र ठिकाणावरून तर पश्चिम विदर्भातील यात्रेचा प्रारंभ जिजाऊ चे माहेरघर सिंदखेड राजा येथुन होणार आहे.

याचा प्रचार आणि प्रसिद्धी ,पूर्व तयारी ,संघटनात्मक बांधणी करिता विदर्भ राज्य आंदोलन समिती चे पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुणभाऊ केदार आणि युवा आघाडी अध्यक्ष्य मुकेश मासुरकर यांचा गडचिरोली जिल्हा दौरा ७ आणि ८ फेब्रुवारीला होणार आहे. दिनांक ७ फेब्रुवारी मंगळवार

# सभा वडसा

# सभा कुरखेडा

दिनांक ८ फेब्रुवारी बुधवार

# गडचिरोली पत्रकार परिषद सकाळी ११ वाजता.

# सभा दुपारी १ वाजता. स्थळ : शिवाजी महाविद्यालय धानोरा रोड गडचिरोली

सर्व पदाधिकारी यांनी कार्यकर्ते, विदर्भ प्रेमी जनता सर्वांना निरोप द्यावा.

आणि कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन अरुण पाटील मुनघाटे जिल्हा समन्वयक , जिल्याध्यक्ष राजेंद्रसिह ठकुर , अशोकभाऊ पोरेडीवार, शंकर शेकुर्तीवार , गोवर्धन चव्हाण , शालीक नाकाडे, ग्यानचंद सहारे, घीसुपाटील खुणे, रमेश उप्पलवार , रमेश भुरसे, अमिता मडावी , अर्चना चुधरी, सुनिता मडावी, विलास रापर्तीवार , नागसेन मेश्राम , सुरेश बारसागडे , नसीर जुम्मन शेख , दिपक दुर्गे विदर्भ राज्य आंदोलन समिती गडचिरोली चे पदाधिकारी यांनी एका पत्रकातून केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post