कोजबी येथे 75 टक्के अनुदानावर संयुक्त वन व्यवस्थापन समितीद्वारे गॅसचे वितरण

दिनेश बनकर सुपरफास्ट बातमी गडचिरोली


कोजबी:- संयुक्त वन व्यवस्थापन समिती अंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना एलपीजी गॅसचे वितरण करण्यात आले. वडसा वन विभाग पोरला वन परिशेत्रा अंतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समिती कोसबी व लोहारा येथील अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांना त्याच्या मागणीनुसार 75 टक्के अनुदान सवलती दराने एलपीजी गॅसचे वाटप करण्यात आले पोरला वनपरिक्षेत्रातील नियत शेत्रा लोहारा कोजबी गावात वाघाचे वास्तव्य असल्याने व समिती सदस्याने एलपीजी गॅस ची मागणी वनविभागाकडे केल्याने सदस्यांच्या वरील बाबींचा विचार करून वनविभागा मार्फत एल पी जी गॅसचे समिती सदस्यांना वितरण करण्यात आले.



या गॅस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री डी डी के उईके क्षेत्र सहायक शिरसी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मनोहर गेडाम व लोहारा येथील वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अनिल बरडे समिती सचिव श्री नितीनजी गडपायले यांची प्रमुख उपस्थिती होती यांच्या प्रमुख उपस्थितीत एलपीजी गॅस वितरण कार्यक्रम पार पडले गावातील जंगलामध्ये वाघाचे वास्तव्य असल्याने त्याचे संरक्षण व संवर्धन तसेच ग्रामस्थांनी घ्यावयाची काळजी याबाबत व वनवा प्रतिबंधक उपाय योजना याबाबत क्षेत्र सहायक डी डी के उईके व श्री नितीनजी गडपायले वनरक्षक यांनी जनतेला मोलाचे मार्गदर्शन केले गॅस वितरण कार्यक्रम निमित्याने लोहारा कोजबि येथील ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post