सेन्सेक्स ९०० अंकांनी वधारला, पण अदानींच्या शेअर्सची दाणादाण..



━━━━━━━━━━━━━
🏦 जागतिक मध्यवर्ती बँकांनी महागाई कमी होण्याचे संकेत दिल्याने व्याजदरवाढीचे सत्र थांबेल या आशेने अमेरिकेसह आशियाई बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत.

📈 तसेच फायनान्सिल स्टॉक्समधील वाढीमुळे आज शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजीत सुरुवात केली होती. सेन्सेक्स ४०० अंकांनी वाढून आज खुला झाला होता. तर निफ्टी १७,७०० वर खुला झाला होता. दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान सेन्सेक्स ९३३ अंकांनी वाढला. तर निफ्टीने १७,८०० वर व्यवहार केला. त्यानंतर सेन्सेक्स ९०९ अंकांनी वाढून ६०,८४१ वर बंद झाला. तर निफ्टी २४३ अंकांनी वाढून १७,८५४ वर बंद झाला.

▪️ *अदानींच्या शेअर्सची दाणादाण*
📉 आजच्या व्यवहारातही अदानी शेअर्संमधील घसरण कायम राहिली. अमेरिकेतील शॉर्ट- सेलर हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. अदानींचे १० शेअर्समध्ये घसरण कायम असून त्यांच्या बाजार भांडवलात निम्म्याने घट झाली आहे. यामुळे अदानींच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे ७ दिवसांत १० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

🏢 अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी ग्रीन एनर्जी हे शेअर्स १० टक्क्यांनी खाली आले आहेत. अदानी पोर्टस्, अदानी विल्मर हे ५ टक्क्यांनी घसरले आहेत. हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर फसवणुकीचे आरोप केल्यानंतर बँकांनी अदानी यांच्या वित्त स्थितीची छाननी सुरू केली आहे. यातून सावध होत, सिटी ग्रुपच्या संपत्ती व्यवस्थापन विभागाने मार्जिन कर्जासाठी तारण म्हणून अदानी समूहाच्या कंपन्यांचे रोखे स्वीकारणे बंद केले आहे.

👉🏻 *असा राहिला आज बाजार..* 
टायटन कंपनीचा शेअर आज ५.५४ टक्क्यांनी वाढून २,४३६ रुपयांवर पोहोचला. शिवाय इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फिनसर्व्ह हे आजच्या व्यवहारातील टॉप गेनर्स होते. तर पॉवर ग्रिड, नेस्ले इंडिया, टेक महिंद्रा, एचसीएल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे शेअर्स घसरले.

Post a Comment

Previous Post Next Post