कार्यक्रमात हुल्लडबाज करणाऱ्या तरुणांना भेटला दांडूक्याचा मार


पुणे: सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध (Famous On Socail Media) लावणी नर्तिका गौतमी पाटीलच्या (Lavani Dancer Gautami Patil) कार्यक्रमात महिला दंडुके घेऊन पुढे आल्याने चांगलीच चर्चा होत आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बहिरवाडी येथे लावणी क्वीन गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रेक्षकांनी गौतमीच्या आदाकारीला भरभरुन प्रतिसाद देत जल्लोष केला. women come to Gautami Patil's program with sticks

मात्र काही तरुणांनी कार्यक्रमात धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी गौतमी आणि आयोजकांना कार्यक्रम थांबवण्याची वेळ आली होती. दरम्यान गावच्या महिलांनी अखेर दांडक्याने धुडघुस घालणाऱ्यांना चोप दिला. धुडगूस घालणाऱ्यांना महिलांनीच चांगला धडा शिकवल्याने पुन्हा एकदा गौतमीचं कार्यक्रम चर्चेत आलं आहे. गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, गौतमीच्या कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांकडून धुडगूस घालण्याचा प्रयत्न होतोय. तर काही भागात कार्यक्रमांवर बंदी, गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दांडक्याने दिला चोप
अशीच काही परिस्थिती पुण्यातील बहिरवाडी गावात निर्माण झाली होती. मात्र गावातील महिलाच दंडूके घेऊन पुढे आल्या आणि कार्यक्रम पार पडला. अधिक माहीती अशी की, बहिरवाडी गावात यात्रा उत्सवानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हुल्लडबाज तरुणामुळे लावणीचं कार्यक्रम थांबवण्याची वेळ आली. त्या दरम्यान गावातील महिलांनी पुढाकार घेत धुडगुस घालणाऱ्यांना दांडक्याने चांगलाच चोप दिला.

Post a Comment

Previous Post Next Post