मोटरसायकलच्या धडकेत एक ठार कवलेवाडा टी-पॉईंट येथील घटना




 गोंदिया : भरधाव वेगात असलेल्या दोन मोटरसायकलची आपसांत धडक होऊन घडलेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. चिचगड पोलिस ठाण्यांतर्गत कवलेवाडा टी-पॉइंट येथे शुक्रवारी (दि. २४) दुपारी दोन वाजतादरम्यान ही घटना घडली. मृताचे नाव झनकलाल देवलाल कोसरे (५२, रा. कोटजांभोरा, देवरी) असे आहे.

मोटरसायकल क्रमांक (एमएच ३५ एएम २४८८) च्या चालक दीपमाला पन्नादास वैष्णव (रा. ग्रामीण रुग्णालय, चिचगड) यांनी त्यांची मोटरसायकल हलगर्जीपणे चालवून

समोरून येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक (एमएच ३५ एच ४८३८) ला धडक दिली.

या धडकेत झनकलाल कोसरे यांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात जागवंती झनकलाल कोसरे (४५) यांच्या तक्रारीवरून आरोपी दीपमाला यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३३८, ३०४ (अ) सहकलम १८४ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तपास पोलिस उपनिरीक्षक चुन्नीलाल हुर्रे करीत आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यात भरधाव वेगातील वाहनांमुळेच अपघात घडताना दिसत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post