घर व गोठ्याला लागलेल्या आगीत १८ शेळ्या गाय ठार मलपुरी येथील घटना : शुक्रवारी मध्यरात्रीची घटना


 गोरेगाव तालुक्यातील मौजा मलपुरी : येथे घर व गोठ्याला लागलेल्या आगीत १८ शेळ्या व एक गाय जळून ठार झाली. याशिवाय घरातील जीवनावश्यक वस्तू व कपडे जळून राख झाले. शुक्रवारी (दि. २४) मध्यरात्री अचानकपणे ही आग लागली.


प्राप्त माहितीनुसार, देवेंद्र सीताराम कोवाची यांच्या घर व गोठ्याला शुक्रवारी (दि. २४) मध्यरात्री अचानकच आग लागल्याने संपूर्ण घरातील जीवनोपयोगी सामान नष्ट झाले. तर सोबतच १८ शेळ्या व एक गाय आगीत जळून राख झाली. पंचायत सभापती मनोज बोपचे यांना माहिती मिळताच त्यांनी त्वरित मलपुरी येथे



घटनास्थळी जाऊन देवेंद्र कोवाची यांची भेट घेतली. यावेळी बोपचे यांनी त्यांना दोन हजार रुपयांची आर्थिक मदत करून तलाठी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याकरिता आदेश दिले. घर व गोठ्याला लागलेल्या आगीने देवेंद्र कोवाचे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आग नेमकी कशी लागली याविषयी माहिती मिळू शकली नाही.

आगीच्या घटनांत वाढ

विशेष म्हणजे, जिल्ह्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शहरातील शगून लॉनमध्ये शुक्रवारी उभ्या असलेल्या एका कारला आग लागली आहे. त्यानंतर आता ही घटना घडली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post