उघडा (नग्न) फिरणे हा माझा अधिकार



स्पेनच्या उच्च न्यायालयाने अलेजांद्रो कोलोमार या २९ वर्षीय पुरुषाच्या बाजूने निकाल दिला आहे, काही दिवसांपूर्वी त्याला व्हॅलेन्सियातील अल्दिया शहराच्या रस्त्यावरून विवस्त्र फिरल्याबद्दल पोलिसांनी दंड ठोठावला होता. न्यायालयीन सुनावणीतही त्याने नग्न जाण्याचा प्रयत्न केला होता. २०१० पासून नग्नावस्थेत फिरणाऱ्या अलेजांद्रोला आता कोर्टाने रस्त्यावर विवस्त्र फिरण्याची परवानगी दिली आहे.

दंडामुळे वैचारिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन झाले, असा युक्तिवाद त्याच्या वतीने कोर्टात केला. 'दंड निरर्थक आहे, त्यांनी माझ्यावर अश्लील प्रदर्शनवादाचा आरोप केला, जो पूर्णतः चुकीचा आहे. शब्दकोशानुसार त्याचा अर्थ लैंगिक हेतू आणि (त्याचा) मी जे करत होतो त्याच्याशी काहीही संबंध नाही', असेही त्याने म्हटले, त्याआधी पायात फक्त बूट घालून कोर्टात प्रवेश करताना त्याला रोखण्यात आले आणि अधिक कपडे घालण्याचा आदेश देण्यात आला, तो व्हिडीओही व्हायरल झाला आहे. यापूर्वी कनिष्ठ न्यायालयानेही त्याला ठोठावलेला दंड रद्द केला होता. मग उच्च न्यायालयात प्रकरण गेले होते.


Post a Comment

Previous Post Next Post