दिवसाला बारा तास वीज पुरवठा करण्याची मागणी


अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशरी व परिसरातील वीज पंपाची वीज 12 तास देण्याची मागणी केशरी नगरीचे सरपंच नंदकुमार पाटील गहाणे प्रकाश पाटील गहाणे माजी अर्थ बांधकाम सभापती विजय साळवे तालुका युवा मोर्चा विलास बोरकर यांच्याकडून केली जात आहे हा परिसर अतिदुर्ग आदिवासी बिहुल क्षेत्र असून परिसरात जंगल व्याप्त भाग आहे जंगलालगत शेती असून जवळपास पंधरा दिवसापूर्वी एका महिलेला वाघाने हल्ला करून ठार केले अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्याच पाठोपाठ आता विद्युत विभागाने आठ तास लाईनीचे शेड्युल निर्माण करून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अडचणीचे सामना करण्याचा भाग पाडले तरी शेतकऱ्यांनी शेतात जायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मका लागवडीचे क्षेत्र निर्माण झाले आहे मका हा जवळपास चार ते पाच फुटापर्यंत उंच होऊन जर विद्युत विभागाने अशा पद्धतीचे शेड्युल ठेवल्यास मका पिकविणे सुद्धा कठीण होईल असे लक्षात येतात केसरी नगरीचे सरपंच यांनी पुढाकार घेऊन तात्काळ शेतकऱ्यांच्या मागणीचे विचार विनिमय करून जिल्ह्याचे पालकमंत्री यांना बारा तास वीज पुरवठा करून देण्यात यावा असे निवेदन देऊन शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा निर्माण करण्याचे कार्य केशरी नगरीचे सरपंच नंदकुमार पाटील गहाणे यांनी परिसरातील जनतेचे प्रश्नाकडे लक्ष वेधले

Post a Comment

Previous Post Next Post