दिव्यांग्यांच्या मदतीसाठी सरसावले तरुणांचे हात




तालुका प्रतिनिधी कोरची
    तरुणांचे हात हे उगारण्यासाठी नसतात तर उभारण्यासाठी असतात.तरुणांकडून समाजाच्या व राष्ट्राच्या जडण -घडणीची अपेक्षा व्यक्त केली जाते ह्याच अपेक्षेच्या पुर्ततेकरिता वनश्री कला व विज्ञान महाविद्यालय कोरचीयेथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पंचवीस रासेयो तरुण विद्यार्थी -विद्यार्थिनीचे हात दिव्यांग्यांच्या मदतीकरिता सरसावले.
      कोरची पंचायत समिती येथील शिक्षण विभागाच्या वतीने ग्रामीण रुग्णालय कोरची येथे सन २०२३ या सत्रात दिव्यांग तपासणी व दिव्यांगतत्व प्रमाणपत्र ऑनलाईन नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
    यावेळी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.व्ही.टी.चहारे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवीस रासेयो स्वयंसेवकांनी सहभाग घेऊन दिव्यांगांची सेवा केली आहे.


  वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे की,'भांग मे कंगवा डाले। घडी-घडी कपडे बदले।तुन्हे सेवाहि नहि कि।तो सुंदर दिखते क्या?जो खुदके लिए जिता वह जिना नहि।जो सेवा मे मरता वह मरणा नहि।हा सेवाभाव संतांनी आपल्या प्रत्यक्ष जीवनात उतरविला आणि मगच समाजाला उपदेश करायला सुरुवात केली.त्याचप्रमाणे स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी आपण जगलो पाहिजे हे राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य हृदयात रुजवून दिव्यांगांच्या सेवेसाठी स्वयंसेवकांनी स्वतःला समर्पित केले.
    कोरची पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या विविध वस्ती-पाड्यातून येणाऱ्या दिव्यांगांना त्यांच्या गाडीतून उतरवून व्हीलचेअरवर बसवून त्यांना नोंदणी करण्यासाठी घेऊन येण्याचे काम काही स्वयंसेवक करीत तर काही स्वयंसेवक नोंदणी झाल्यानंतर दिव्यांगांची आरोग्य तपासणी करण्यासाठी डॉक्टरांच्या चमूकडे नेण्याचे काम काही स्वयंसेवक करीत होते तर काही स्वयंसेवक दिव्यांगांना नाश्त्याच्या स्टॉलकडे नेऊन त्यांची नाश्त्याची व्यवस्था सुरळीतपणे पार पाडली.
   अशाप्रकारे रासेयो स्वयंसेवकांनी दिव्यांगांच्या मदतीकरिता सहभागी होऊन सामाजिक बांधिलकीची जपणूक केली.


Post a Comment

Previous Post Next Post