प्रेयसीनं धोका दिल्यानं तरुणानं मंडपात घुसून चिरला गळा; पाहुण्यांची धावपळ

प्रेयसीनं प्रेमात धोका दिल्याच्या कारणावरून बॉयफ्रेंडने तरुणीच्या लग्नात जोरदार राडा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मंडपात विवाहसोहळा उरकण्यासाठी आलेल्या तरुणीच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं वार करत तरुणानं घटनास्थळावर पळ काढला.
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद शहरात ही घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी हल्लेखोर तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे.
या घटनेमुळं पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील कायदा व सुवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रिलेशनशिपमध्ये असताना तरुणीचं लग्न तिच्या कुटुंबियांनी दुसऱ्या मुलासोबत जमवलं होतं.




ही बाब तरुणीच्या प्रियकराला रुचली नाही.
त्यामुळं आरोपी तरुणानं प्रेयसीच्या लग्नात नवीन कपडे घालून थेट तरुणीच्या गळ्यावर सपासप वार करत तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर नवरीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समजताच पाहुण्यांनी तातडीनं मंडपाजवळ धाव घेत हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला.





परंतु हातात धारदार शस्त्र असल्यामुळं आरोपी हल्लेखोर पाहुण्यांच्या कचाट्यातून फरार होण्याची यशस्वी झाला आहे.
त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.





पोलीस घटनास्थळी दाखल होत जखमी तरुणीला उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल केलं आहे.

याशिवाय पीडित तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे.
पीडित तरुणीच्या गळ्यावर खोलवर जखमा झाल्या असून तिचं जेवण बंद करण्यात आलं आहे.
परंतु तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

Post a Comment

Previous Post Next Post