ठाणेगांव परीसरात दोन वाघांचा मुक्त संचार



ठाणेगाव :- आरमोरी तालुक्यातील ठाणेगांव परीसरात दोन वाघांचा मुक्त संचार दिसुन येत असल्याने नागरीक धास्तावले आहेत. यामुळे वनविभागाने वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकातून केली जात आहे. ठाणेगाव परिसरातील खोब्रागडी नदी व पौराणिक हेमांडपंथी शिवमंदिराला लागून असलेल्या शेतामध्ये काल
शुक्रवारला शेतकऱ्यांना वाघाचे
दर्शन झाले असून,शेतकऱ्यांमध्ये वाघाची दहशत पसरली आहे.

ठाणेगाव व परिसरातील ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाचे दिली. साधन आहे. त्या शेतकऱ्यांनी
मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड केली आहे. त्यामुळे त्या परिसरात अनेक शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी व देखभाल करण्यासाठी अनेक शेतकरी शेतावर गेले होते. शेतावर काम करीत असताना अनेक शेतकऱ्यांना वाघाची डरकाळी ऐकायला मिळाली तर काही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सामोरा- सामोर वाघाचे दर्शन झाले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आरडाओरड केली. लगेच गावातील नागरिकांना याची माहिती देऊन शेतावर जाऊन फटाके फोडले. त्यामुळे वाघ मक्याच्या शेतामधुन निघुन दुसरीकडे गेल्याची माहिती गावकऱ्यांनी

असल्याने मक्याच्या शेतात कोणताच प्राणी दिसुन येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये जाणे जिकिरीचे झाले आहे. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून वनविभागाचे अधिकारी गस्त वाढवुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. सोबतच विज वितरण

विभागाच्या लोडशेडींगमुळे शेतकऱ्यांचा संकटात भर पडली मक्याच्या शेतामध्ये लपन आहे. सध्या विज वितरणने एक

आठवडा रात्र पाळी व एक आठवडा दिवसा लोडशेडींग चालू केल्याने शेतकऱ्यांना रात्री शेतावर जाऊन पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. त्यामुळे विज वितरण विभागाने दिवसा विज उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे वनविभागाने लवकरात लवकर वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली

Post a Comment

Previous Post Next Post