बीएसएफ जवानांवर नक्षल्यांचा हल्ला



कांकेर (छत्तीसगड):  छत्तीसगड येथील कांकेर जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. येथील जिल्हा पोलिस अधीक्षक शलभ सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलिस आणि बीएसएफची संयुक्त पार्टी गस्तीवर निघाली होती. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी हल्ला केला. पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात नक्षलवादी पळून गेले.

४ ते ५ नक्षलवादी जखमी झाल्याचे वृत्त आहे. सकाळी ७.३० वाजता आणि नंतर सकाळी १० वाजता दोन वेळा नक्षलवाद्यांची पोलिस कर्मचाऱ्यांशी चकमक झाली आहे. परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. अतिरिक्त फौजफाटाही पाठवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

कांकेरमध्ये अनेकदा आमने-सामने

कांकेर पोलिस आणि बीएसएफ जवानांनी जिल्ह्यातील अंबेडा पोलिस ठाण्यांतर्गत दरो खल्लारी आणि तामोरा या जंगलातून दोन नक्षलवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून वॉकी टॉकी, रोख रक्कम. कुन्हाड आणि इतर नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. बीएसएफ आणि डीआरजी पोलिसांच्या संयुक्त शोध मोहिमेदरम्यान पोलिस जवानांना हे यश मिळाले आहे. अलीकडच्या काही काळामध्ये छत्तीसगडमध्ये पोलिस आणि नक्षलवादी अनेकदा आमनेसामने • आल्याचे दिसून येत आहे.

नक्षली इमारत उद्ध्वस्त

कांकेरमध्ये सुरक्षा बदलांच्या सततच्या कारवाईनंतर नक्षलवादी बॅकफूटवर आहेत. जवानांनी दोन फेब्रुवारी रोजी कांकेरमधील आमाटोला खैरीपदर जंगलात एक नक्षली इमारत उद्ध्वस्त केली होती. ही इमारत चकमकीत ठार झालेला डीव्हीसी सदस्य दर्शन पद्दाच्या स्मृत्यर्थ उभारण्यात आली होती. घटनास्थळावरून जवानांनी आक्षेपार्ह साहित्यही जप्त केले होते. ही कारवाई बीएसएफ १३२ वटालियन आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली होती. गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या चकमकीत दर्शन पद्दासह दोन नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला होता. यापूर्वी ८ फेब्रुवारी रोजी पोलिस स्टेशन ताररेमअंतर्गत गुंडम चुटवाई जंगलात चकमक झाली होती. या चकमकीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post