ईव्हीएमपेक्षा बॅलेटवर भाजपा जिंकू शकते राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचे खोचक ट्विट



राज्यातील पाच पदवीधर-शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात ज्ञानेश्‍वर म्हात्रे निवडून आले. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक ट्विट करत भाजपाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.



कोकण पदवीधर मतदार संघात ज्ञानेश्‍वर म्हात्रे निवडून आले प्रथम त्यांचे अभिनंदन. ईव्हीएमपेक्षा बॅलेटवर सुद्धा भाजपा निवडणूक जिंकू शकते हे सिद्ध झाले. इथून पुढे येणार्‍या प्रत्येक निवडणुका भाजपाने ईव्हीएम ऐवजी बॅलेटवर घेण्याचे औदार्य दाखवावे असे खोचक ट्विट करत भाजपाला डिवचण्याचा मिटकरी यांनी प्रयत्न केला.

Post a Comment

Previous Post Next Post