हत्तीरोग संदेश



हत्तीरोग हा क्युलेक्स डासांपासून होणारा आजार आहे. रोगाचे प्रमाण महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यामध्ये परिपुर्णपणे कमी झालेले असुन भंडारा, चंद्रपुर, गोंदिया, गडचिरोली ह्या चार जिल्ह्यातील हत्तीरोगाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी १० फेब्रुवारी ते २० फेब्रुवारीपर्यंत या जिल्ह्यात सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येत आहे.

या जिल्ह्यातील माता-भगिनी व बंधुंना विनंती आहे की, आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करा व देण्यात येणाऱ्या गोळीची मात्रा आवश्य घ्या व सुरक्षित रहा. आपण सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत हत्तीरोग निर्मुलन कार्याला व आपले राज्य 'हत्तीरोग मुक्त महाराष्ट्र' करण्यासाठी सक्रिय सहकार्य व सहभाग द्याल, ही अपेक्षा.


Post a Comment

Previous Post Next Post