अखेर पोलिसांनी केली नाना पाटेकरला अटक


सोलापूर - नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पांगरी येथील फटाका फॅक्टरी ला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. Fire crackers factory

या घटनेत 5 महिलांचा मृत्यू तर 3 महिला गंभीर जखमी झाल्या होत्या.
सोलापूर पोलिसांनी फटाका फॅक्टरी मालकविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. Crime news
आगीच्या घटनेला 1 महिना उलटला तरी मुख्य आरोपी नाना पाटेकर हा पोलिसांच्या हाती लागत नव्हता, तो सतत पोलिसांना चकवा देत होता, स्थानिक गुन्हे शाखेने पसार नाना पाटेकर यांच्या शोधासाठी पथक नेमले. Nana patekar
तब्बल महिन्याभरानंतर पोलिसांना खबरी मार्फत गोपनीय माहिती मिळाली, आरोपी पाटेकर हा तामिळनाडू राज्यात पळाला होता, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तामिळनाडू राज्यात पोहचले.
तांत्रिक बाबीचा अभ्यास करीत पोलीस नाना पाटेकर पर्यंत पोहचले व त्याला बेड्या ठोकल्या.
पाटेकर ला बार्शी न्यायालयात हजर केले असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post