ईतर धार्मिक स्थळांप्रमाणे कचारगडचा सुध्दा विकास करावा.- महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ नामदेवराव उसेंडी




गोंदिया : आशिया खंडातील सर्वात मोठी महाकाय प्राचीन गुफात गोंडीयन संस्कृती रचनाकार पारी कुपार लिंगो ३३ कोट सगापेन, १२ पेन के ७५० गोत्र, रायताल जंगो, संगीत सम्राट हीरासुका पाटालीर, शंभूशेक व कली कंकाली, सल्लाशक्ती यांच्या पावन भूमीवर राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन व महा-गोंगोना कोयापुनेम महासम्मेलन दिनांक ०३ फरवरी २०२३ ते ०७ फरवरी २०२३ पर्यंत महाराष्ट्र राज्यातील जिल्हा गोंदिया सालेकसा तालुक्यातील कचारगड / धनेगाव येथे कचारगड महाजत्रा आयोजित करण्यात आले आहे.
या यात्रेच्या निमित्ताने दि ०५ फरवरी २०२३ रोजी रात्री राष्ट्रीय गोंडीयन सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आले आहे.



     या जत्रेत महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांनी मार्गदर्शनातून मागील वर्षापासून आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा कचारगडला असून, आदी काळापासून या गुफेमध्ये आदिवासीं समाजाचे धर्म संस्थापक पहांदी पारी कुपार लिंगो यांनी त्यांच्या अनुयायांना धार्मिक शिक्षण, सामाजिक रचना व सांस्कृतिक शिक्षण देण्याचे काम केल्याची आदिवासी समाजामध्ये भावना भावना आहे. या भावनेपोटी दरवर्षी माघ पौर्णिमेला कचारगड येथे जत्रा भरत असते. या जत्रेत संपूर्ण भारतातून जवळ पास ८ ते १० लाख आदिवासी श्रद्धाळू उपस्थित असतात. त्यांच्यासाठी मुलभूत सोयी सुविधा शासनाने पुरवावी. अशी जन सामन्याची इच्छा आहे, परंतू मागील ३० वर्षापासून या धार्मिक स्थळाच्या नियोजनबध्द विकास करण्यात शासन व लोकप्रतिनिधी कमी पडत आहेत. तरी शासनाने स्वयम पुढाकार घेऊन कचारगड या धार्मिक स्थळाचा ईतर धार्मिक स्थळाप्रमाणे विकास करावा.




    सांस्कृतिक महोत्सवात भारत देशातील विविध राज्यातील आदिवासी गोंडी रेला नृत्य सादर केला. यावेळी विविध राज्यातील आदिवासी नेते, पदाधिकारी व खुप मोठ्या संख्येने आदिवासी जनसमुदाय व यात्रेकरू उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post