LIC ची सर्व माहिती मिळेल आता व्हॉटअप वर



वृत्तसंस्था / मुंबई : तुम्ही देखील एलआयसी (LIC) पॉलिसी धारकांपैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.

एलआयसी

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

आता एलआयसी ने व्हॉट्सअॅप सेवा सुरू केली आहे. विमा कंपनीच्या या सुविधेमुळे, पॉलिसीधारकांना एलआयसी कार्यालयात जाण्याची गरज नाही. कारण त्यांची सर्व कामे व्हॉट्सअॅपद्वारे केली जातील. यामुळे आता एलआयसी पॉलिसीधारकांना काही विशेष सेवांचा फायदा होणारेय. ज्या पॉलिसीधारकांनी आपली पॉलिसी एलआयसी पोर्टलवर नोंदणी केली आहे त्यांना ही सुविधा उपलब्ध असेल यासोबतच ज्या एलआयसी पॉलिसीधारकांनी आपली पॉलिसी ऑनलाइन रजिस्टर केली नाही. त्यांनी सर्वात आधी व्हॉट्सॲप सेवेचा लाभ घेण्यासाठी एलआयसीच्या अधिकृत साइटला भेट देऊन पॉलिसीची नोंदणी करुन घ्यावी. तुम्हाला तुमच्या एलआयसीकडे नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवावा लागेल. 8976862090 या मोबाईल क्रमांकावर Hi पाठवून ग्राहकांना पॉलिसी सेवांशी संबंधित माहिती घरबसल्या मिळू शकते.

Post a Comment

Previous Post Next Post