12 वीच्या परीक्षेत चालते इथे खुलेआम कॉफी



यवतमाळ, 01 मार्च : 10 वी आणि 12वी ची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी शिक्षण विभागाकडून अभियान राबविले जात आहे. त्यासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली. मात्र या कॉपी मुक्त अभियानाचा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्याच्या काटखेडा येथील उच्च माध्यमिक विद्यालयात फज्जा उडवला जात आहे.

विद्यालयामध्ये आज (दि.01) सुरू असलेल्या 12 वीच्या फिजिक्स पेपर दरम्यान कॉप्यांचा बाहेरून पुरवठा केला जात होता. काही विद्यार्थ्यांना वर्ग खोलीच्या खिडकीतून कॉपी पुरवण्यासाठी अक्षरशः झुंबड दिसून येत होती. शाळेच्या मागील बाजूने तर भिंतीवर उभे राहून कॉपी दिली जात आहे. येवढ्या मोठ्या प्रमाणात हा सर्व प्रकार खुलेआम सुरू असताना परीक्षा केंद्रावरील शिक्षक नेमके काय करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खुलेआम कॉपी प्रकरणाने शिक्षण विभागातील काही महाभाग आणि शाळा प्रशासनाच्या कर्तव्यावर सवाल उपस्थित केला जात आहे. इंग्रजी विषयाच्या पेपर दरम्यान या ठिकाणी धाड टाकण्यात आली होती. तेव्हा अक्षरशः पोत भर कॉपी अढळून आल्या होत्या. त्यानंतर ही या केंद्रावर बिनधास्त कॉपी केली जात आहे. या प्रकारामुळे हुशार विद्यार्थ्यांना मात्र गोंधळाचा सामना करावा लागला.

Post a Comment

Previous Post Next Post