गोंदियामध्ये असाच एक खळबळजनक प्रकार समोर आलाय. यामध्ये दोन व्यक्तींनी व्हिडिओ तयार करून कॉपी केली म्हणून एका महाविद्यालयाकडून खंडणी मागितली आहे.




Copy in Exam : राज्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटल्यानंतर कॉपीच्या अनेक घटना समोर आल्या. अशात आता या गोष्टीचा फायदा घेत काही भामटे यात आपला हात साफ करताना दिसत आहेत. गोंदियामध्ये असाच एक खळबळजनक प्रकार समोर आलाय. यामध्ये दोन व्यक्तींनी व्हिडिओ तयार करून कॉपी केली म्हणून एका महाविद्यालयाकडून खंडणी मागितली आहे. या दोन्ही भामट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Gondia News)


मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्हाच्या रावणवाडी पोलिस ठाणे हद्दीत ग्राम दासगाव येथील अनुसया पशिने हायस्कूल आणि अर्चना पशिने आर्ट्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज येथे २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ही घटना घडली. दोन व्यक्तींनी या सेंटरवर कॉपी करत पेपर लिहिला जात असल्याचा व्हिडिओ तयार केला. तसेच २० हजारांची खंडणी मागण्यास सुरूवात केली. महेंद्र लिल्हारे (३५, रा. इंगळे चौक गोंदिया) आणि दिनेश पटले (३६.रा.चिंचगाव, गोरेगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

बारावीचा इंग्रजीचा पेपर सुरू असताना आरोपी महेंद्र लिल्हारे व दिनेश पटले हे दोघेही अनुसया पशिने कॉलेज येथे जाऊन तिथल्या इमारतीवर चढले. या कॉलेजमध्ये कॉपी केली जाते असा व्हिडिओ तयार करून प्राचार्यांना २० हजार रुपयांची मागणी केली. या घटने संदर्भात प्राचार्या वंदना परसराम बिसेन (५२,रा. दुर्गा भवन,साई मंदिर रोड,सिव्हिल लाईन,गोंदिया)हा सर्वप्रकार लक्षात येताच प्राचार्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी आरोपी महेंद्र लिल्हारे आणि दिनेश पटले या दोघांवर कलम ३८५,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post