चिकन बनविले नाही म्हणून दारूच्या नशेत पत्नीला बेदम मारहाण


चंद्रपूर - धुलीवंदनाच्या दिवशी चंद्रपूर शहरात क्षुल्लक वादात पतीने पत्नीला बेदम मारहाण केली, या मारहाणीत पत्नी गंभीर जखमी झाली, याबाबत शहर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. Crime news

7 मार्चला जिल्ह्यात धुलिवंदनाचा उत्साह सुरू होता, अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त लावला होता मात्र शहरातील पठाणपूरा भागात चिकन का नाही बनविलं यासाठी पत्नीला बेदम मारहाण करण्यात आली. Chandrapur







सकाळच्या सुमारास राजेश कश्यप दारूच्या नशेत घरी आला त्याने पत्नीपुढे चिकन खायची इच्छा व्यक्त केली, मात्र जेवण तयार असल्याने सायंकाळी चिकन बनविणार असे पत्नीने सांगितले असता यावर पतीचा राग अनावर झाला त्याने अंगणात असलेला लाकडी दांडा हातात घेत पत्नीच्या डोक्यावर वार केला. व तुला जीवानिशी ठार मारतो अशी धमकी देत तिथून पसार झाला.
रक्तबंबाळ अवस्थेत सौ. कश्यप जमिनीवर कोसळल्या त्यांचा आवाज ऐकून आरोपीची बहीण धावत आली. Holi 2023
त्यांनी तात्काळ कुटुंबियांना बोलावीत जखमी अवस्थेत असलेल्या सौ. कश्यप यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले.
पोलिसांनी आरोपी राजेश कश्यप वर कलम 326 अंतर्गत गुन्हा दाखल केला, शहर पोलिसांना पठाणपुरा येथील पानठेल्यावर आरोपी उभा असल्याची माहिती मिळाली असता त्याला अटक करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post