विदर्भ निर्माण यात्रेचे मोवाड शहरात भव्य स्वागत

विदर्भ निर्माण यात्रेचे मोवाड शहरात भव्य स्वागत :::



वेगळा विदर्भासाठी राज्यभर शेतकरी संघटनेचे आंदोलन :::


राजेंद्र बागडे नागपूर विभागीय प्रतिनिधी ता.8 

         विदर्भ राज्य आंदोलन समितीचा विदर्भ राज्यासाठी गड़चिरोली जिल्यातील कालेश्वर मंदिरातुन (शिरोंचा) विदर्भ निर्माण यात्रेला प्रारंभ झाला. विदर्भ आंदोलन समितीचे विदर्भ प्रमुख मुकेश मासुलकर, नात्यासाहेब मते, आमदार रमेशपंथ गजभिये यांच्या नैतृत्वात ही यात्रा काढण्यात आली.यावेळी नरखेड तालुका प्रमुख वसंतराव वैद्य, बळीराम सोनकुसळे, विट्ठल मानेकर, वसंतराव बहुरूपी, डॉ. संजय सोलंकी, रामचंद्र बहुरूपी,शंकरराव बहुरूपी, यांच्या तर्फे विदर्भ निर्माण यात्रा दिंडीचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मोवाड येथील शेतकरी संघटनेने बाजार चौकात जय विदर्भ शेतकरी सिंधुताई यांचा हस्ते माल्यार्पण करण्यात आले. मोवाड नगरीमध्ये विदर्भ राज्य हमारा है लेके रहेंगे, विदर्भ राज्य लेके रहेंगे, शरद जोशी जिंदाबाद अमर रहे, अमर रहे, राम नेवले अमर रहे, असा जय घोष करण्यात आला. मोवाड येथील उपस्थित जनतेला मार्गदर्शन करताना विदर्भवादी नेत्यांनी प्रखरं भूमिका स्पष्ट केली विदर्भातून महाराष्ट्रात समावेश करून 75 वर्षे झाली परंतु विदर्भाचा विकास झाला नाही तर उलट विदर्भाला भकास करण्याचे काम चालू आहे. पश्चिम महाराष्ट्राचे नेते विदर्भाच्या दोहन करीत आहे.आजच्या घडीला महाराष्ट्र सरकार कर्जबाजारी आहे शासकीय पगार करण्याची सोय नाही विदर्भात जल,जमीन, खनिज, संपत्ती मोठ्या मनात असून त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्र ला होत आहे.असे मत वैद्यकीय नेत्यांनी व्यक्त केले. 
यावेळी नरखेड तालुका अध्यक्ष वसंतराव वैद्य, विठ्ठलराव मानेकर, डॉ, संजय सोळंके, रामचंद्र बहुरूपी, शंकरराव बहुरूपी, बळीराम सोनटक्के, रमेश वैद्य, प्रकाश वालूरकर, शिवशंकर ढेपले, विष्णू देवघरे, जानराव नेवले, ओकार सिंग सूर्यवंशी, किसना बनाईत, विनोद नारनवरे, धनराज बोडके, पुरुषोत्तम राऊत, ज्ञानेश्वर राऊत, दीनदयाल वैद्य, प्रवीण सातपुते, ज्योती खांडेकर, विद्याताई चव्हाण, प्रभाताई राऊत, इंदिरा बरोले, लता सातपुते, गीता धकीते, चंदा वैद्य, सिंधू हेडाऊ, लक्ष्मण खसारे, दिवाकर दारोकर, साहेबराव देवते, विष्णू बनाईत, रामचंद्र भंदीर्गे, लक्ष्मी वैद्य, हेमंत वैद्य, माजी भीम आर्मीचे अध्यक्ष तथा तालुका प्रतिनिधी वसंत पाटील, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post