घर बांधकामात हटकताच कोयत्याने केला हल्ला नेरी येथील घटना : चिमूर ठाण्यात गुन्हा दाखल


 चिमूर : घराचे बांधकाम करताना साहित्य अंगणात पडत असल्याने शेजारच्याने हटकताच घर बांधणाऱ्या मालकाने कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना चिमूर तालुक्यातील नेरी येथे गुरुवारी घडली. तक्रारीवरुन पोलिसांनी यशवंत वैरागडे याच्यावर कलम ३२४, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, वैरागडे यांच्या पत्नी नेरी येथील ग्रा. पं. सदस्य आहेत.

नेरी येथील गांधी वॉर्डात हरिचंद बांगडे यांचे घर आहे. त्यांच्या घरासमोर यशवंत वैरागडे यांच्या घराचे डबल मजलीचे बांधकाम सुरू आहे. या घराच्या बाजूने बांगडे यांचा घरी जाण्याचा रस्ता असून बांधकामाचा सिमेंट रस्त्यावर व त्यांच्या अंगणात पडते. त्यामुळे रहदारीस अडचण होते. शुक्रवारी वरच्या मजल्यावर खिडकी पाना बांधकाम सुरू केल्याने बांगडे यांच्या पत्नीने वैरागडे याना माझे पती व मुलगा घरी नाहीत ते घरी आल्यानंतर खिडकीचे बांधकाम करा, असे सांगताच शेजारी यशवंत वैरागडे यांनी आहेत.

हातात कोयता घेऊन बांगडे यांच्या पत्नीशी वाद घातला. त्यांच्याशी हातापायी केली. यावेळी त्यांचे मंगळसूत्र तुटले तसेच साडीही फाटली. काही वेळानंतर मुलगा व पती घरी आल्यानंतर त्यांनी मुलाला व पतीला झालेली हकिगत सांगितली.

मुलगा आकाश बांगडे विचारणा करण्यास गेला असता, त्याने कोयता घेऊन वाद घालत मुलावर वार केला. हाताच्या दंडाला वार लागला. यावेळी त्याला जिवे मारण्याची धमकीही दिली. त्याने तत्काळ चिमूर पोलिस स्टेशन गाठून तक्रार केली. पोलिसांनी यशवंत वैरागडे याच्याविरुद्ध ३२४, ३२३, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास चिमूर पोलिस करीत

Post a Comment

Previous Post Next Post