महाराणा प्रताप चौक, पंचवटी नगर तहसिल कार्यालयासमोर आरमोरी येथील चौकात असलेल्या स्नेहल सेलिब्रेशन लॉन येथील ध्वनीप्रदुषण बेतला आहे नागरिकांच्या जीवावर....





आरमोरी : पंचवटीनगर हा परिसर दाट लोकवस्तीचा असनु या परिसरात स्नेहल सेलिब्रेशन लॉन आहे. या लॉन मध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेतल्या जातात त्यावेळी मोठ्या आवाजात डि.जे. वाजविण्यात येत असल्याने या परिसरातील नागरीकांना याचा खुप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच लॉन मालकाला जाब विचारल्यास, माझ्या लॉन जवळ घर बांधल्यास मी काय करू, असे उत्तर मिळते आणि अन्नाची दुर्गंधी सुध्दा येत असते,आजुबाजुला रक्तदाबाचे रुग्ण, नवजात बालक, लहान मुले असल्याने त्या लॉनमधील डीजेचा आवाजाचा येथील नागरिकांच्या आरोग्यावर मोठा
परिणाम होत आहे..




करीता सदर परिसर Residential असल्याने या परिसरात लॉन बांधण्याची परवांगी नगरपरिषदेकडुन कशी मिळाली असा सवाल येथील नागरिकांना पडत आहे. त्यामुळे वाजवी पेक्षा जास्त आवाज ठेवणाऱ्या लॉन मालकावर व संबंधित आयोजकावर कार्यवाही करुन ध्वनी प्रदुशनावर आळा घालून लॉन बंद करण्यात यावा. अशी मागणी परिसरातील नागरिकांनी नगरपालिका,तहसील ऑफिस, पोलिस स्टेशन मध्ये लेखी निवेदन देऊन केली. यावेली अनेक नागरीक उपस्थित होते. कारवाई न केल्यास उपोषणाला बसू असा इशारा संबंधित नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post