पोलिस पाटलाच्या धाब्यावरून दारू जप्त एकाला अटक, एलसीबीची कारवाई



धानोरा (वा.). पोलिस मदत केंद्र येरकड येथून दीड किलोमीटर अंतरावर पोलिस पाटील यांच्या धाब्यावर अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याच्या माहितीवरून गडचिरोलीच्या एलसीबी पथकाने छापा टाकून 7,980 रूपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली. या प्रकरणी पोलिस पाटील यांना अटक करण्यात असून सदर करवाई 27 फेब्रुवारी रोजी करण्यात आली.

धानोरा -‍ -मुरूमगाव राष्ट्रीय महामार्गाला लागून पोलिस पाटील शिवा भैसारे यांचा प्रेम नावाचा धाबा आहे. या धाब्यावर काही महिन्यांपासून देशी व विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे एलसीबी टीमचे पोलिस निरीक्षक राहुल आव्हाड व

चार अंमलदारांनी 27 फेब्रुवारी रोजी सदर धाब्यावर छापा टाकत प्रेम धाबा मालक व पोलिस पाटील यांच्याकडील 7,980 रुपयांची देशी, विदेशी दारू जप्त केली. आरोपीला 28 फेब्रुवारीला न्यायालयात हजर केले असता त्यांची जमानतीवर सुटका करण्यात आली. अधिक तपास पोलिस निरीक्षक कैलास माळी करीत आहेत. तर पोलिस शिपाई प्रशांत गरफडे यांनी फिर्याद दिली. यापूर्वीही याच धाब्यामधून देशी-विदेशी दारू पकडण्यात आली होती, अशीही चर्चा सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post