पाचव्या पत्नीने केली पतीची हत्या , गळा चिरुन गुप्तांगही कापले




भोपाळ, : . पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने टोकाचे पाऊल उचलले. पत्नीने गळा चिरुन पतीची हत्या केल्यानंतर त्याचे गुप्तांगही कापले. ही घटना मध्य प्रदेशात समोर आली. विशेष म्हणजे आरोपी मृतकाची पाचवी पत्नी आहे.

कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत 21 फेब्रुवारीला पोलिसांना रस्त्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाच्या मानेवर आणि गुप्तांगावर जखमा होत्या. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. कोतवाली पोलिस स्टेशनचे अधिकारी अरुण पांडे यांनी सांगितले की, उर्ती गावातील रहिवासी बिरेंद्र गुर्जरचा मृतदेह 21 फेब्रुवारीला त्यांच्या घराजवळील रस्त्यावर सापडला होता. या घटनेची माहिती बिरेंद्रची पत्नी कांचन गुर्जरने पोलिसांना दिली. त्यानंतर अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

कुऱ्हाडीने केले वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेने पतीच्या जेवणात झोपेच्या 20 गोळ्या मिसळल्या. त्यामुळे जेवणानंतर पती गाढ झोपी गेला. यानंतर पत्नीने त्यांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिने पतीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले. इतकेच नाही तर त्यानंतर महिलेने पतीचे गुप्तांगही कापले. त्यानंतर पतीचा मृतदेह घरापासून काही दूर अंतरावर फेकून दिला.



चौकशीत हत्येचा उलगडा



पोलिस तपासात मृत बिरेंद्रची पत्नी कांचनही संशयाच्या भोवऱ्यात आली.
तिला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता संपूर्ण सत्य समोर आले. कांचनने पोलिसांना सांगितले की, पतीला अंमली पदार्थाचे व्यसन होते. तो दारुच्या नशेत तिच्यावर खूप अत्याचार करायचा, याला कंटाळून तिने पतीला संपवले. तसेच तपासात समोर आले की. मृताच्या छळाला कंटाळून त्याच्या चारही पत्नी त्याला सोडून गेल्या होत्या. त्यानंतर मृताने कांचन गुर्जर हिच्यासोबत पाचवे लग्न केले.

Post a Comment

Previous Post Next Post