पुरुषांच्या 'या' खास गुणांवर महिला होतात फिदा, तुमच्यात आहेत का हे गुण?



आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रामध्ये (Ethics) मनुष्याच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांची गणना जगातील महान विद्वानांमध्ये केली जाते. चाणक्य यांनी पुरुषांच्या काही गुणांबद्दल सांगितलं आहे, ज्यांच्यावर स्त्रिया आकर्षित होतात. (Chanakya Niti women flattered on these qualities of men Marathi Ethics Tips)

आचार्य चाणक्य (Chanakya Niti About Life) यांना राजकारण, मुत्सद्देगिरी आणि अर्थशास्त्राचं भरपूर ज्ञान होतं असं मानलं जातं. त्यांनी दिलेलं तत्वज्ञान चाणक्य नीती म्हणून ओळखलं जातं. मानवी जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. खास करू स्त्री पुरूष संदर्भात त्यांनी महत्त्वाची माहिती सामान्यांना पोहोचवली होती.

महिलांशी चांगलं वागणं
जे पुरुष स्त्रियांचा आदर करतात, स्त्रियांशी प्रेमाने, सभ्यतेने आणि सौजन्यानं बोलतात, त्या पुरूषांवर महिला फिदा होतात. महिलांनाही अशा पुरुषांना आपला जीवनसाथी बनवायला आवडतं, असं चाणक्य नीतीमध्ये सांगितलं आहे.

शांत आणि संयोजित पुरुष
पुरुषाची वर्तवणूक चांगली असेल तर, तो सर्वांची मने जिंकतो. जे पुरुष शांत, साधे आणि सौम्य स्वभावाचे असतात, स्त्रिया त्यांच्या प्रेमात लवकर पडतात. मुला अशा मुलांकडे लवकर आकर्षित होतात, असं चाणक्य नीतीमध्ये सांगितलं आहे.

पुरूषांचं मन आणि स्वभाव
स्त्रिया देखील पुरुषांचे व्यक्तिमत्व पाहत असतात. स्त्रिया पुरूषांच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करतात, असं दिसून येतं. मात्र, आयुष्याचा जोडीदार शोधताना त्यांच्या मनाकडे पाहतात. पुरूषांचं मन किती मोठं आहे, यावरून त्याच्या स्वभावाचा अंदाज लावला जातो.

श्रोता स्वभावाचा पुरुष 
अनेकदा असं दिसून येतं की, महिलांना ऐकून घेणारे पुरूष आवडतात. लक्षपूर्वक ऐकणारे पुरुष महिलांना आवडतात. लहान-मोठी गोष्टींची टाळाटाळ न करता महिलांचं मत जाणून घेणारे पुरूष महिलांना भावतात.


दरम्यान, आचार्य चाणक्य (Acharya Chankya) यांनी आपले आयुष्य सुखकर बनवण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय सुचवले आहेत. अनेकदा गैरसमज किंवा छोट्या मोठ्या कारणांमुळे पती-पत्नीच्या प्रेमाच्या (Chanakya Niti for Husband and Wife) नात्यात दुरावा निर्माण होतो. त्यावर देखील आचार्य चाणाक्य मार्गदर्शन (Acharya Chankya Upay) केलं आहे. त्यामुळे त्यांचे उपाय तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल घडवू शकतात.

Post a Comment

Previous Post Next Post