तिमरम (गुड्डीगुडम )येथे क्रिकेट विजेत्या संघाना बक्षीस वितरण



अहेरी :-आझाद क्रिकेट क्लब तिमरम च्या वतीने आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे नुकतेच ग्रा. प. तिमरम चे सरपंच सरोजा पेंदाम यांच्या हस्ते विजेत्या संघाना बक्षीस वितरण करण्यात आले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सरोजा पेंदाम तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पेंदाम, मीनाक्षी सडमेक, प्रतिष्टीत नागरिक चिन्नू सडमेक,महेश सडमेक,शंकर पेंदाम, नरेंद्र सडमेक,सुरेश पोरतेठ, संतोष श्रीरामवार,अनिल पेंदाम उपस्थित होते.
या प्रसंगी प्रथम पारितोषिक जि. आर क्रिकेट संघ टेकमपली, द्वितीय आझाद क्रिकेट संघ तिमरम तर तृतीय पारितोषिक क्रॅश क्रिकेट संघ झिमेला संघांनी पटकाविले.

विजेत्या संघाना रोकरक्कम आणि शिल्ड सरपंच सरोजा पेंदाम यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या वेळी मंडळाचे मुख आयोजक उमेश पेंड्याला, अध्यक्ष प्रफुल पेंदाम, सचिव राकेश सडमेक,श्रीकांत सडमेक, रुपेश पेंदाम, तुषार बोगामी, सूर्यकांत सडमेक आदी सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post