राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने भाजपा विरोधात आंदोलन घरगुती गॅस सिलेंडर पोस्टरची होळी





धुळे: राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे घरगुती वापरासाठी येणारे गॅस सिलेंडर भाववाढ केल्या बद्दल भाजप सरकार विरोधात वाडीभोकर रोड येथे गॅस सिलेंडर पोस्टरची होळी करत, आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आले,


सर्वसामान्य नागरिकांना महागाईचे चटके देत आहेत.. व महागाईचे चटके सहन करीत गरीब जनता होरपळून निघतेय काल भाजप सरकारने 50 रुपयाने घरगुती गॅस सिलेंडरचे भाववाढ करून हे सिद्ध करताय की ते गरिबांचा विचार करत नाहीत,


उज्ज्वला गॅस योजना मोदी सरकारने आणले व तोही सपसेल फेल गेला व आता महागाईची घोडदौड जलदगतीने सुरू आहे, ती थांबता थांबत नाहीये अशाने गृहिणीचे बचतीचे बजेड मागे पडलेय हे भाजप सरकार अच्छे दिनचे दिवास्वप्न दाखवून गरीब जनतेला फसवून सत्तेत जाऊन बसले खरे पण आता जनतेचाच विसर जणू त्यांना पडलाय पण आजच्या कसबा पेठ चा निकाला वरून दिसतेय की जनता आता सदसद्विवेकबुद्धीने विचार करून मतदान करीत आहे, ही महागाई सर्वसामान्य जनतेला नपरवडणारी आहे..


यावेळी जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, शहराध्यक्षा सरोज कदम, संजीवनी पाटील, रश्मी पवार, प्रितम देशमुख, फरजाना शाह, शबाना शेख, वंदना, केदार, निर्मला शिंदे, संगिता खैरनार, जॅक, सागर सैंदाने, भैया माळी, कृष्णा बेडसे, सागर पवार, सनी वाघ, सोनू भामरे, करन ठाकरे, खंडू मोरे, ईफान पिंजारी, संदीप सैंदाने, समीर पिंजारी, बाळा सोनवणे, उपस्थित होते...

✍🏻 सौ. ज्योती पावरा
जिल्हाध्यक्षा:- राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी, धुळे.
सौ. सरोज कदम
शहराध्यक्षा:- राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी,धुळे.

Post a Comment

Previous Post Next Post