ठाणेगावच्या शेतशिवारातील विहिरीत आढळले अज्ञात इसमाचे प्रेत



आरमोरी:  आरमोरी - पोलिस ठाण्यांतर्गत विहिरीत अज्ञात इसमाचे प्रेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

शामराव भुरसे रा. ठाणेगाव ता. आरमोरी जि. गडचिरोली यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली होती. त्याने सांगितले की, त्यांच्या शेतात असणाऱ्या विहीरी मध्ये कोणीतरी अज्ञात इसम मयत स्थितीमध्ये पडलेला असून विहीरीमध्ये त्याची प्रेत पाण्यावर तरंगत आहे. पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी पोलिस पथकासह त्यांच्या शेतामध्ये जावुन शहानिशा केली असता विहीरीमध्ये एक पुरूष जातीचे अनोळखी इसम मृत अवस्थेत दिसुन आला. मयताचे अंगावर पिवळ्या रंगाचे त्यावर निळया आहेत.

उभ्या रेषा असणारा फुल बाह्यचा शर्ट आणि कथ्या रंगाचा फुल पॅन्ट व त्याचे उजव्या हाताच्या बोटामध्ये तांबूस रंगाच्या धातुची अंगठी घातलेली असुन अंदाजे वय ४० वर्षे असून उंची ५.७ फूट आहे.

ते प्रेत विहीरीच्या बाहेर काढुन पोलीस कारवाई करून पोलिस स्टेशन आरमोरी येथे मर्ग दाखल करण्यात आला. प्रेताचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे करण्यात आले असुन पोलिस स्टेशन आरमोरी व नगर परीषद आरमोरी यांचे मार्फतीने अनोळखी मयत इसमाचा अंत्यविधी करण्याची तजविज ठेवण्यात आली आहे. या मर्गा तपास आरमोरी पोलिस करीत आहे 

Post a Comment

Previous Post Next Post