आयटीआय चौकातील गोंडीयन सल्ला गांगरा दैवतांची जागा हडपण्याचा प्रयत्न


गडचिरोली _ चंद्रपूर रोडवरील आयटीआय चौकाजवळील जागेवर गोंडीयन समाजाचे सल्ला गांगरा हे आदिवासी चे दैवत असुन गेल्या १८- २० वर्षापासून त्या ठिकाणी गोंडवाना गोटुल समिती. र. क्र. महा. २७ / २०१2 गडचिरोली नुसार त्या जागेवर सल्ला गांगरा , विर बाबुराव सडमाके जयंती , राणी लक्ष्मीबाई जयंती आदी गोंडीयन समाजाचे अनेक धार्मीक कार्यक्रम घेतल्या जातात. दि . १२ मार्च 2023ला शहिद विर बाबुराव सडमाके जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर नगर परिषद गडचिरोली च्या सि . ओ . ने नोटिस देवून सदर जागेवरील आदिवासीचे दैवत हटवा असे नोटिस बजावले. वास्तविक सदर जागा हि नझुलंची असुन कोणाच्या मालकीची नाही. तसी सहानिसा न करता नगर परिषदेच्या सि. ओ . ने . आदिवासी बांधवांना विनाकारण त्रास देणे सुरु केले आहे.सदर जागेवर कुणाचीही तक्रार नसतांना व आदिवासी बांधव सदर जागेवर गेल्या २० वर्षांपासून आदिवासी दैवताची पुजा-पाठ व विविध कार्यक्रम घेत असनांना आदिवासी बांधवाना विनाकारण त्रास देणे सुरु केल्यामुळे आदिवासीं बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. तरी सदर जागेबाबत कुणीही त्रास देवू नये व आदिवासी बांधवांना सदर जागेवर आपल्या दैवताचे कार्यक्रम करू घ्यावे. आदिवासी बांधवा ना आपल्या दैवताची पुजा करण्यासाठी इतरत्र जागा नाही . सदर जागा हि एकमेव जागा आहे . तेव्हा त्या जागे वर आदिवासी बांधवाना कार्यक्रम करू घ्यावे अश्या प्रकारचे निवेदन शासनाला आदिवासी गोटुल सामितीच्या बैठकीत ठराव घेवून शासनाला निवेदन पाठविण्यात आले. सदर बैठकीला सुरेज किरंगे ' वंसत पेंदराम. सेवा . पो . नि . बारीकराव मडावी , सेवा . नि . पो. शिवराम कुमरे सेवा नि . पो . निरिक्षक, चरणदास पेंदाम. केशव गेडाम , चंदु कुळमेथे , कुणाल कोवे हरिभाऊ मडावी. विष्णुदास कुमरे वर्षा पेड्राम' माया कोटनाके , उदय नरोटे . विठोबा मडावी , मालती पुडो ' , कुसुम वाळवे , सुनिता तलांडी प्रतिभा कुमरे , संगिता टेकाम ' सुनंदा गेडाम , आदी सहीत बहुसंख्य आदिवासी महिला व बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post