दंतेवाडा नक्षली हल्ला: 10 DRG जवानांपैकी 5 जवान नक्षलवाद सोडून DRG मध्ये दाखल झाले होते



नवी दिल्ली :
छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे Chhattisgarh jawan नक्षलवादी हल्ल्यात शहीद जवानांबाबत मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 10 DRG जवानांपैकी 5 जवान नक्षलवाद सोडून DRG मध्ये दाखल झाले होते. यातील एक जवान महिनाभरापूर्वीच या पोलिस दलाचा सदस्य झाला होता. अशी माहिती समोर आली आहे. बस्तर रेंजचे आयजी सुंदरराज पी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पाचही जण नक्षलवाद्यांसाठी काम करायचे.मात्र आत्मसमर्पण केल्यानंतर सर्वजण पोलिसांसाठी कामाला लागले. सुकमाच्या शेजारच्या दंतेवाडा जिल्ह्यातील अर्लमपल्ली व दंतेवाडातील हे नक्षलवादी 2017 व 2020 मध्ये DRG मध्ये सामील झाले होते.

दंतेवाडा येथील बडे गडम गावातील रहिवासी असलेला जवान गेल्या महिन्यातच डीआरजीमध्ये रुजू झाला होता. या DRG जवानांना सन ऑफ सॉईल किंवा धरतीपुत्र असेही म्हणतात. या दलात स्थानिक तरुणांची भरती केली जाते. नक्षलवाद्यांप्रमाणे त्यांनीही जंगलाचा प्रत्येक कोपरा व्यापला आहे. त्यांच्या मजबूत स्थानिक स्त्रोतांमुळे त्यांना नक्षल चळवळीची अचूक माहिती सहज मिळते. जिल्हा राखीव रक्षक दलात (डीआरजी) सामील होणारे बहुतांश तरुण नक्षलवाद सोडून मुख्य प्रवाहात सामील होत आहेत. डीआरजी ही राज्य पोलिसांची एक शाखा आहे. सात नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी त्याची स्थापना करण्यात आली. सुमारे 40 हजार चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या बस्तर विभागात डीआरजीचे जवान नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत.

स्फोटानंतर मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये सुरक्षा कर्मचारी रस्त्याच्या कडेला पडून परिसराला वेढा घालण्याच्या सूचना देताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये गोळीबाराचा आवाजही ऐकू येतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माओवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी रात्री सीआरपीएफ आणि राज्य पोलिसांच्या डीआरजीच्या सुमारे 200 जवानांनी दंतेवाडाच्या दरभा विभागात कारवाई सुरू केली. ऑपरेशनवरून परतत असताना अरणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी त्यांना लक्ष्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post