वेळेवर वीज आली नाही तर महावितरण कंपनीकडून घ्या 500 रूपये...


नाशिक : कोणत्याही शासकीय, निमशासकीय कार्यालयांना नियमांच्या चौकटीत राहून कामकाज करावे लागते. त्यानुसार महावितरण कंपनीला देखील ग्राहकांना सेवा देण्यासाठी नियमांचे पालन करावे लागते. परंतु ग्राहकांना याबाबतची पुरेशी माहिती नसल्याने याबाबतचा दावा केला जात नाही. वास्तविक ग्राहकांना निर्धारित वेळेत वीज सेवा मिळाली नाही तर ग्राहक महावितरणकडून भरपाई मागू शकतात.

ग्राहकांना निर्धारित वेळेत विजेची सेवा दिली पाहिजे असे बंधनकारक आहे. जर निर्धारित वेळेत सुविधा दिली गेली नाही तर महावितरणकडून ग्राहकाला भरपाई मिळू शकते. लघु आणि उच्चदाब ग्राहकांना प्रति तास प्रमाणे भरपाई मागण्याचा अधिकार आहे. वेळेत वीज आली नाही, फ्यूज दुरुस्ती, जळालेले मीटर, भूमिगत लाईन याबाबत शहरी आणि ग्रामीण भागासाठी भरपाईची तरतूद आहे.

अनभिज्ञ की सावधानता वीज नियामक आयोगानेच जर अशाप्रकारच्या भरपाईची तरतूद केलेली असेल आणि तरीही महावितरणकडून अशा प्रकारची भरपाई दिलेली नसेल तर ही बाब दडवून ठेवण्यात आली असावी असा संशय घेतला जात आहे.



..तर ग्राहकांना ५० किंवा १०० रुपयांची भरपाई

विलंबाने सेवा दिली तर राज्य विद्युत वीज नियामक आयोगाने

महावितरणकडून भरपाई देण्याची तरतूद केली आहे. लघुदाब ग्राहकांना प्रति तास ५० रुपये किंवा जास्तीत जास्त ५०० रुपये आणि उच्चदाब ग्राहकांना प्रति तास १०० रुपये आणि जास्तीत जास्त १ हजार रुपयांची भरपाईची तरतूद केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post