युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी भर्रे, मातेरे तर सचिव पदी शेंडे यांची निवड



*देसाईगंज*
तालुका युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी अमर भर्रे रा. कुरूड, व मच्छींद्र मातेरे रा. अरततोंडी यांची तर सचिवपदी आक्रोश शेंडे रा. कोंढाळा, महासचिवपदी अमर बगमारे रा. विसोरा, नेताजी बुराडे रा. मोहटोला, महेश चंडीकार रा. आमगांव तर सहसचिवपदी धनपाल गणविर रा. कसारी यांची निवड करण्यात आलेली आहे. सदर नियुक्ती युवक कॉंग्रेस तालुका अध्यक्ष पंकज चहांदे यांनी नुकतेच देसाईगंज येथे केली.
     सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी तालुका काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, उपाध्यक्ष नितीन राऊत, नरेंद्र गजपुरे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले.
    सर्वच नियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष लारेन्स गेडाम, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी आ. आनंदराव गेडाम, आ. विजय वडेट्टीवार, माजी आ. डॉ. नामदेवराव उसेंडी आदींना दिले आहे.
      तालुक्यात युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर पंकज चहांदे यांची निवड झाल्यापासून युवक काँग्रेसला गावा-गावात मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी तालुका कॉंग्रेस कमिटी व युवक काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून हाथ से हाथ जोडो अभियानही संयुक्तीकपणे यशस्वी राबविले. त्यांच्या ह्याच कार्यामुळे युवक काँग्रेसला नवनविन लोक जुळत आहेत. लवकरच तालुक्यात युवक कॉंग्रेसची मोठी फळी निर्माण होणार असल्याची माहिती युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष पंकज चहांदे वरील पदाधिकारी यांची निवड करतांना दिली.

Post a Comment

Previous Post Next Post