हनुमान जयंती निमित्त बसली वानरसेनाची पंगत


अकोला : अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील कोथळी बुजरूक गावात काल हनुमान जयंती निमित्त एक अनोखी पंगत पार पडली आहे. ही पंगत देण्यात आली होती चक्क 'माकडांना'. गावातील मुंगसाजी महाराज संस्थानच्यावतीनं माकडांना मिष्टान्नाची पंगत देण्यात आली. विशेष म्हणजे माकडांनीही अगदी शिस्तीत हा पंगतीचा आस्वाद घेत मिष्टान्नांवर ताव मारलाय. या अनोख्या पंगतीचे फोटो सध्या व्हायरल होताय. रामदास महाराज शिंदे यांनी माकडांना ही पंगत दिली आहे.

पूर्वीपासून तर सद्यस्थितीत पर्यंत वेगवेगळ्या पंगती पाहण्यात येतात अन् आपण पाहत आलो. मात्र, काल अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील कोथळी बुजरूक गावात एक अनोखी पंगत पार पडली आहे. ही अनोखी पंगत चक्क होती माकडांची. काल हनुमान जयंती निमित्त माकडांची अनोखी पंगत बसली. केवळ मनुष्यालाच नव्हे तर प्राणी मात्रांवर दया करणे ही धर्माची शिकवण देणारी पंगत ठरली आहे.


अकोला बुजरूक गावात मुंगसाजी महाराज संस्थान आहे. या संस्थानच्यावतीने काल चक्क हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर माकडांना मिष्टान्नाची पंगत देण्यात आली. विशेष म्हणजे इथे माकडांनीही अगदी शिस्तीत या पंगतीचा आस्वाद घेत मिष्टान्नांवर ताव मारला आहे. या अनोख्या पंगतीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. इथल्या रामदास महाराज शिंदे यांनी माकडांना ही पंगत दिली आहे.


सुरुवातीला संस्थांसमोर जेवणाचं ताट वाढण्यात आले. त्यानंतर निमंत्रणाचा मानापमान न ठेवता माकडे थेट झाडावरून उतरून खाली येऊन रांगेत बसले. माकडांना प्रत्येकी एक या प्रमाणे जेवणाचं ताट वाढण्यात आलं होतं. या ताटात मिष्टांनांची चांगली मेजवानी दिसून आली. हनुमान जयंतीनिमित्त वानरसेनेचा हा अनोखा पाहुणचार पाहून अनेकांच्या सोशल मीडियावर कमेंट होताना दिसत आहेत. आता माकडांची ही शिस्तीतील पंगत माणसांनाही लाजविणारी ठरली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post