जन्मदात्या बापाने दारुच्या नशेत पोटच्या चिमुकल्या मुलाचा गळा दाबून केला खून


दिनेश बनकर कार्यकारी संपादक 

चंद्रपूर, 9 एप्रिल : दारू ही माणसाला कधी हैवाण बनवेल सांगता येत नाही. दारुमुळे एका चिमुकल्याचे प्राण गेल्याची घटना उघडकीस आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्याच्या राजोली येथे जन्मदात्या बापाने दारुच्या नशेत पोटच्या चिमुकल्या मुलाचा गळा दाबून खून केला व नंतर स्वतःवर चाकूने वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची मन सुन्न करणारी धक्कादायक घटना रविवार 9 एप्रिल रोजी उघडकीस आली. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गणेश विठ्ठल चौधरी (31) खून केलेल्या निर्दयी बापाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, गणेश विठ्ठल चौधरी (31) हा पत्नी काजल आणि 3 वर्षीय मुलगा प्रियांशुसह मूल तालुक्यातील राजोली येथे राहत होता. हनुमान जयंतीच्या दिवशी तो दारु पिऊन पत्नीला मारहाण केल्याने ती घाबरून घरून निघून गेली. घरी स्वतः गणेश आणि मुलगा प्रियांशु राहत होता दरम्यान गणेशने पुन्हा दारू ढोसून दारुच्या नशेत रविवार 9 एप्रिल रोजी पहाटे आपल्या पोटच्या मुलाचा गळा दाबून खून केला. गळा दाबून खून केल्याने गणेशने स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला



घटनेची माहिती होताच मूल पोलीस घटनास्थळ गाठून पंचनामा केला व गणेशला उपचारकरिता रुग्णालयात दाखल केले. तर घटनेची माहिती आई काजल ला माहीत होताच तिने हंबरडा फोडला.

Post a Comment

Previous Post Next Post