गुराख्याने केला महिला मजुरावर अत्याचार





 गोंदिया : रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम पांढराबोडी येथील गौशाळेत काम करणाऱ्या महिला मजुरावर तेथील गुराख्यानेच अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी (दि.७) दुपारी ३ वाजता घडली. दुसऱ्या दिवशी आरोपी रतनारा येथील लग्नाच्या आशीर्वाद समारंभात गेला असता त्याला लोकांनी बेदम मारहाण केली. प्रदीप भोजराज नागपुरे (३५, रा. महालगाव- मुरदाळा) असे आरोपीचे नाव आहे.

तालुक्यातील ग्राम पांढराबोडी येथे गौशाला असून तेथे गुरे चारण्यासाठी महालगाव मुरदाळा येथील प्रदीप नागपुरे हा मागील दोन वर्षांपासून गुराखी म्हणून काम करीत होता. त्याच गौशाळेत मागील एक वर्षापासून काही

महिला शेण उचलणे व इतर कामे करण्यासाठी मजूर म्हणून कार्यरत आहेत; परंतु त्या महिलांपैकी २८ वर्षीय महिलेवर आरोपी प्रदीप नागपुरे याने शुक्रवारी (दि.७) दुपारी ३ वाजता स्वयंपाक खोलीत अत्याचार केला. त्यानंतर शनिवारी (दि.८) प्रदीप नागपुरे हा रतनारा येथे एका लग्न समारंभात जेवण करण्यासाठी गेला असता या प्रकरणावरून लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. या घटनेसंदर्भात रामनगर पोलिस ठाण्यात रविवारी (दि.९) भादंवि कलम ३७६ (२), ३२३, ३४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून तपास सहायक पोलिस निरीक्षक आसाराम चव्हाण करीत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post