वादळाने सभामंडपावर झाड कोसळून ७ ठार





दुःख निवारणास आलेल्यांवर दुःखाचा डोंगर

 पारस (अकोला) : सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कडुनिंबाचे झाड सभामंडपावर कोसळून येथील बाबूजी महाराज संस्थानात आयोजित दुःख निवारण कार्यक्रमासाठी आलेल्या सात भाविकांचा मृत्यू झाला, तर ४० जण जखमी झाले. जखमींपैकी पाच जण गंभीर असल्याची माहिती आहे.

पारस येथील बाबूजी महाराज संस्थान येथे दर रविवारी भाविक दर्शनासाठी येतात. या ठिकाणी रात्री १० वाजता 'दुःख निवारण' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. रविवारीही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. होते.

कार्यक्रमाची तयारी सुरू असताना सायंकाळी ७:३० वाजता अचानक वादळी वारा सुटला आणि कडुनिंबाचे झाड मंडपावर कोसळले. त्याखाली दबल्याने तीन पुरुष व चार महिला ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटू शकली नव्हती. या घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी धाव घेतली. ग्रामस्थांनी जखमी भाविकांना बाहेर काढून उपचारार्थ रुग्णालयात रवाना केले. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. बाळापूर पोलिस घटनास्थळी पोहोचले असून, बचावाचे कार्य सुरू
आहे.

Post a Comment

Previous Post Next Post