पैशावरुन वाद; पत्नीने धाडले पतीला यमसदनी ,सिरोंचा तालुक्यातील कोर्ला येथील घटना



गडचिरोली, : पैशाच्या कारणावरुन पती-पत्नीत झालेला वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात पत्नीने पतीच्या डोक्यात मुसळाने वार करीत पतीला यमसदनी धाडल्याची घटना सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या कोला येथे मंगळवारी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास घटली. या घटनेमुळे कलासह परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे.

शंकर लस्मय्या दुर्गम (40) रा. कोली ता. सिरोंचा असे मृतक पतीचे तर सुशिला शंकर दुर्गम ( 35 ) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, शंकर दुर्गम व त्याची पत्नी सुशिला दुर्गम यांच्यात मंगळवारला दुपारच्या सुमारास पैशाच्या कारणावरून वाद निर्माण झाला. सदर वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात सुशिलाने पतीच्या डोक्यात मुसळ घातला. या हल्याने रक्तबंबाळ झालेल्या शंकरचा काही

क्षणात जागीच मृत्यू झाला. घटनेची तक्रार शंकरचे वडिल लस्मया दुर्गम ( 65 ) यांनी आसरअल्ली पोलिस स्टेशनला दिली. तक्रारीवरून आसरअल्ली पोलिस स्टेशनचे पोउपनि तानाजी बहिरम, पातागुडम पोमकेचे पोउपनि बालाजी लोसरवार यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. तर रात्रीच्या सुमारास पत्नी सुशिला दुर्गम हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, आज, बुधवारी आसरअल्ली पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली. गुरुवारला तिला न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील तपास पातागुडम पोमकेचे पोउपनि बालाजी लोसरवार करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post